top of page
Search

श्री गजानन महाराज प्रगट दिन उत्सव २०२२| Shri Gajanan Maharaj Pragat Din Utsav 2022

नाशिकतर्फे दरवर्षी प्रमाणे 1008 श्रीमहंत तपोमुर्ती सद्गुरू श्रीवेणाभारती महाराज यांच्या दिव्य उपस्थितीत श्रीगजानन महाराज प्रगटदिनोत्सव व दासनवमी उत्सव साजरा करण्यात आला. उत्सवाचे हे 22 वे वर्ष आहे


🌹भारतभर तीन लाखांहून अधिक अध्यात्मिक प्रवचने व्याख्याने करून धर्मप्रसार जनकल्याण कार्य करणाऱ्या परमहंस सद्गुरू कपिकुल आश्रम पिठाधिश्वरी श्रीवेणाभारती महाराज आशीर्वादीत तसेच अध्यात्म योग निसर्गोपचार तज्ञ उत्तराधिकारी श्रीकृष्णमयी संचलित श्रीमुख्यदेव गजानन महाराज यांचा भव्यदिव्य प्रगटदिन उत्सव बुधवार, दिनांक 23 फेब्रुवारी 2022 रोजी मुठे लेन, रामकुंड पंचवटी येथे कपिकूल आश्रमात मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. या निमित्ताने सकाळी 7 वाजेपासून दिवसभर विविध ज्ञानपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आले.


🌹सकाळी श्री वेणाभारती महाराज यांच्या हस्ते श्रींची मानसपूजा, विष्णुमयी कलामंचद्वारे श्रीगुरुदेव लिखित भजन व ज्ञानकाव्य वाचनाचा ज्ञानरंजक कार्यक्रम, लहान भक्तांची सुंदर प्रभुरामाची नाटिका, गुरुदेवांच्या परिचयाचा सुंदर असा पोवाडा, श्रींचा पालखी सोहळा मुठे यांचे गोरेराम मंदीर येथे खूप उत्साहात साजरा झाला येणाऱ्या सर्व भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेतला.


🌹विशेष गोष्ट म्हणजे

श्री गुरुदेवांच्या सान्निध्यात हा दैवी सोहळा अनुभवण्यासाठी गुरुदेवांचे अनुग्रहीत शिष्य म्हणजे

झी मराठी वरील प्रसिद्ध सिरीयल ' मन उडू उडू झाले....'मधील मुख्य कलाकार इंद्रा म्हणजेच अजिंक्य राऊत व दिपू म्हणजेच ऋता दुर्गुळे हे पालखी सोहळ्यास खास उपस्थित होते.तसेच हिंदी फिल्म इंडस्ट्री मधील प्रसिद्ध कलाकार मुग्धा शहा ...व प्रसिध्द दिग्दर्शक प्रतीक शहा हे देखील उत्सवात उपस्थित होते.

सर्वांनी पालखी सोहळा व महाप्रसादाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.


कोविड संदर्भातील सर्व नियम पाळून, सर्व काळजी घेऊनच हा कार्यक्रम सादर केला गेला.


तसेच शुक्रवार दिनांक 25 फेब्रुवारी 2022 रोजी श्री समर्थ रामदास स्वामी महाराज यांच्या समाधी दिनानिमित्त दिवसभर दासनवमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे ।

यंदाच्या वर्षीचे विशेष महत्त्व म्हणजे कपिकुल या टेक्नो स्पिरीचूअल आश्रमात गुरुदेव व कृष्णमयी यांच्या संकल्पनेनुसार नूतन श्री समर्थ रामदास स्वामीं यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार असून । सर्वांना यावेळी एक आश्चर्यकारक अनोख्या ऑटोमॅटिक व रोबोटिक पद्धतीने समर्थांच्या कुबडी तीर्थाचा ही लाभ सर्वांना घेता येणार आहे । सर्वात महत्त्वाचे दरवर्षी प्रमाणे श्रीसद्गुरू वेणाभारती महाराज त्यांच्या संन्यासी झोळीतील पुण्यदायी दिव्य भिक्षा सर्व भाविकांना वाटप करणार आहेत ।🌹

तरी सर्व भाविकांनी दोन्ही उत्सवांचा लाभ घ्यावा।


कार्यस्थळ: श्री कपिकुल सिद्धपीठम, मुठे लेन, कपालेश्वर मंदिराजवळ, पंचवटी- नाशिक

संकेत स्थळ । www.kapikul.com

संपर्क:8208362950



Comments


bottom of page