top of page
Search

मुंबई येथील अभिनेत्री मुग्धा शाह यांच्या सदनी गुरु पाद्यपूजा व प्रवचन कार्यक्रम

मुंबई गोरेगाव येथे मुग्धा ताई, प्रतिकजी आणि हृता यांच्या घरी गुरुदेव पाद्यपूजा तसेच प्रवचन कार्यक्रम । मुग्धा ताई रामकार्यास जोडलं गेलेलं नुकतंच एक उत्साही फुलपाखरू । रामकार्याचा, गुरू सेवेचा , भक्तीचा सुगंध ज्यांनी जाणला । पहिल्याच भेटीत अनुग्रह । दुसऱ्या भेटीत प्रगटदिन । आणि तिसऱ्या भेटीत घरी चरणपूजा आणि सत्संग आयोजन । अदभुत । miraculous । किती सुंदर परमभाग्य योग । ईश्वर जाणंण नि त्याची सेवा करावीशी वाटण । परमसुंदर । पहिलाच कार्यक्रम पण इतकी सुंदर तयारी । सजावट । कुठेच काही कमी नाही । अख्खी लिफ्ट गुलाब पाकळ्यांनि भरलेली । पायघड्या । संगीत । स्वागत जोरदार । आणि खचाखच खोली buliding भरलेली गर्दीने । गुरुदेवांना पहायला भेटायला चरण पूजेला उत्सुक भावुक उत्साही आनंदी । फार खूपच सुंदर झाला कार्यक्रम । परिपूर्ण । प्रेमपूर्ण । भावभक्ती पूर्ण । प्रवचन तर काय हसून हसून पुरेवाट सर्वांची । सत्य ज्ञान ते ही हसत खेळत हलकं फुलक करून महाराज आत्म्यास जाग देत होते । प्रचंड सुंदर । नतमस्तक । हाच तो मुख्यदेव । साक्षात ईश्वर । अवतरलासी भुवर जड मूढ ताराया । मला हाच आनंद की इतक्या लवकर रामकार्य काय हे समजून तशी कृती करणं । मुग्धा ताई जे भरभरून प्रेम आपण दिलंत । पुन्हा सुंदर केक बनवला, चविष्ट पदार्थांची रेलचेल । भरपेट जेवण । आपुलकी । समर्पण सारेच कौतुकास्पद । रामकार्यास आपला भक्कम हात लाभला याचा मनस्वी आनंद आहे । प्रतिकजीन वरील उत्तम संस्कार क्षनोक्षणी दिसत होते । भिक्षा वेळी त्यांनी गुरू चरणी बसून केलेली जाणीव मदत सुंदर । हृता अजिंक्य ही नंतर आले । महाराजांनी रंग लावला । रंगून गेलो सारे श्रीगजानन श्री गुरुदेव आणि कपिकुल रंगात ।












Comments


bottom of page