top of page
Search

Krishnamai's Birthday 2022 | कृष्णमयीन्चा वाढदिवस २०२२

जय गजानन । 😃 वाढदिवस निमित्ताने सकाळी गुरुदेवांसोबत त्रिम्बकेश्वर येथे जाऊन श्रीनिवृत्ती नाथ महाराज समाधी ला पंचामृत अभिषेक पूजन केल । खूप शांततेत पूजन झालं । आश्चर्य म्हणजे वानरं आली होती बाहेर कितीतरी 😃😃 । मग हृदय संवादिनी वाचन गुरून समवेत करुन आम्ही आधार अनाथ आश्रम ला गेलो, तिथे आत्महत्या केलेल्या शेतकरी लोकांच्या अनाथ मुलांचा सांभाळ केला जातो, तेथे त्या मुलानसमवेत यावर्षी वाढदिवस साजरा करूया अस मनात आलं, निरागसता काय असते सुंदर ते न्याहाळल । आई वडिलांन विना कसे राहत असतील हे आनंदी, प्रश्नच, हेच उद्याच्या भारताचे भविष्य । यांना नीट घडवलं तर ........ मग तांदूळ व साखर पोती दान केली । आपण जी भिक्षा गुरूंना घालतो ती बघा कशी छान या मुलांपर्यंत पोचली, किती उपयोग होईल व आपले दान किती छान ठिकाणी पोचले 😃😃 छोटू छोटू इतकी गोड मुलं होती न ती,😃😃🥰 त्यांनी इतकं छान surprise दिल की औक्षण केलं, गजानन महाराजांचं भजन म्हटलं, आईचा जोगवा नृत्य करून दाखवलं, हातांनी फटाके वाजवले 😃 वाढदिवस म्हणून, मला तर खूप खूप भरून आलं होत, आशा मुलांसोबत वाढदिवस साजरा करण खूप सुंदर वाटलं, स्वतःसाठी नको केवळ, या वंचित मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणण हे खरं सेलिब्रेशन । 😃😃 मग मुलांना कपिकुल चे श्लोक लिहिलेले स्टिकर वाटले । रोज श्लोक वाचून मग अभ्यास सुरू करायचा म्हटल्यावर खुश झाले सर्व, फार वेगळा दिवस होता कालचा हृदय स्पर्शी । 😃😃😃😃





























Comments


bottom of page