top of page
Search

Hanuman Janmotsav at Kapikul Siddhapeeth ...

श्री हनुमंतांचे सद्गुरु वेणाभारती महाराज स्थापित सिद्धपीठ कपिकुल सिद्धपीठम ज्या ठिकाणी रामायण कालीन पुरातन अशी स्वयंभू गरुड आणि हनुमान एकाच मूर्तीत असलेली दिव्य नी सुंदर मूर्ती असून या जागृत स्थानाचा जिर्णोद्धार सद्गुरु वेना भारती महाराज व उत्तराधिकारी कृष्णमयी यांनी सुंदर पद्धतीने केला आहे... हनुमंतांचे तीनही अवतार म्हणजेच कपिवर हनुमंत.. समर्थ श्रीरामदास स्वामी महाराज आणि श्रीगजानन महाराज या श्रीत्रयिंचे असे हे कपि कुळ सिद्ध पीठ या ठिकाणी उद्या दिनांक 5 एप्रिल रोजी सायंकाळी 5 ते 8 या वेळामध्ये श्री हनुमंतांना भारतातील विविध प्रांतातून विविध प्रांताचे पदार्थ नैवेद्य म्हणून बनवून आणण्यात येणार आहेत व त्याचा अन्नकोट केला जाणार आहे... केरळ , महाराष्ट्र , गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश , हरियाणा कर्नाटक, मणिपूर , मेघालय अशा विविध भारतीय प्रांताचे विविध पदार्थ साधक लोक बनवून आणून येथे अन्नकोटाचा कार्यक्रम होणार आहे ... तसेच 6 एप्रिल रोजी पहाटे 6.30 वाजेपासून श्रीहनुमान जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे...श्री हनुमान मूर्तीस आंब्याच्या रसाने अभिषेक केला जाणार आहे..श्री मारुती स्तोत्राची आवर्तने .. भजनांचा कार्यक्रम.. गुरुदेव लिखित ज्ञान कविता वाचन.. सद्गुरूंची पूजा आणि प्रसाद असे कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे .. तसेच यावर्षी अधिक महिना आल्यामुळे 13 महिन्यांचा कल्याण प्रद पुण्य प्रद 13 कोटी नामजप संकल्प आयोजन भक्तांसाठी सद्गुरु वेनाभारती महाराज यांनी केले असून .. गुरूंनी सिद्ध केलेले असे नाम ... असा जप मंत्र ज्याची इच्छा त्या साधकास देण्यात येणार आहे... एक वर्ष आपल्या घरी राहूनच हा जप करायचा आहे.. सद्गुरू सांगतील त्या पद्धतीने जप केल्यास हा आपला 13 कोटी नामजप संकल्प एक वर्षात पूर्ण होण्याची दुर्लभ व अमृत संधी मिळत आहे .. तरी ज्यांची ज्यांची इच्छा आहे हे नाम घेण्याची..13 कोटी संकल्पात सहभागी होण्याची... त्यांनी हनुमान जयंतीदिनी कपिकुल सिद्धपीठ येथे येऊन नाव नोंदणी करावी व नामजप मंत्र घ्यावा.. ज्यांना फोनवरून ही साधना हवी असेल त्यांनी कृपया आम्हाला 8208362950 या नंबर वर संपर्क साधावा...तरी 5 व 6 एप्रिल या दोन्ही दिवस कपिकुल सिद्धपीठम कपालेश्वर मंदिराशेजारी रामकुंड पंचवटी येथे दर्शन उत्सव आणि प्रसादास सर्व भक्तांनी जरूर उपस्थित रहावे....




Σχόλια


bottom of page